कदाचित ...
कालच भेटलो 'ती' ला... मी काही बोलणार तोच ती म्हणाली... मी खूप वाट बघितली तुझी तेव्हा, वाटलं होत आज विचारशील, उद्या विचारशील, पण तू कधी धाडस केलाच नाहीस माझ्या नजरेत स्वतःला शोधायचा कधी प्रयत्नही केला नाहीस... दिसत होत मला तुझ्या डोळ्यातलं प्रेमं दिसत होती तुझ्या हृदयाची तगमग, पण तू फक्त माझ्यासाठी झुरत आणि माझ्याभोवती घुटमळत राहिलास... आताही दिसतय मला तुझ्या डोळ्यात तुझं माझ्यावर असणार तेच प्रेम, तीच तगमग आणि थोडंसं धाडस... पण... पण ती वेळ आता निघून गेली, तुझी ती जखम माझ्यासाठी आता फक्त एक गोड आठवणच राहिली! खर सांगू, एवढाही वाईट नव्हतास तू, हेच धाडस तू तेव्हा केलं असतंस तर जास्तीत जास्त नाहीच म्हणाले असते ना, पण कोणास ठाऊक जर थोडं प्रेमात विचारलं असतंस तर कदाचित ....... - ऋषीकेश