जळती वात...

दुःख नसेल तेव्हा सौंदर्यही निरस वाटते...
दुःख नसेल तेव्हा सुखही निरर्थक वाटते!

कदाचित सुखाची सवयच नाही राहिली मला,
थोड दुःख दे,
पुन्हा सुख अनुभवायचंय मला!

छंद आहे तुझा वेगळा,
जळण्यातच आहे मजा खरी!

पण कुठ हरवलीस तू?
ये ना पुन्हा तू
छोटीशी जखम बनून...



दे नवीन रूप या बुझत्या वातीला,
सुखाची नवी परिभाषा दे या जळत्या जीवाला!!!

- ऋषीकेश

Comments