माझा एक मित्र हरवलाय...
माझा एक मित्र हरवलाय,
तो सापडला का तुम्हाला?
मला तो नेहमी म्हणायचा,
जेव्हा तुला माझी गरज पडेल
तेव्हा तुझ्यासाठी मी असेल,
तुझ्या आधी,
तुझ्या शेजारी,
अन तुझ्या सोबतीला...
पण मी त्याला
कधी असं म्हणालोच नाही
आणि त्यानेही कदाचित
कधी अपेक्षा ठेवली नाही
कारण
आमच नात शब्दांच नव्हत,
ते दोन मनांच होत,
दोन हृदयांच होत,
अन एका आत्म्याच होत...
त्या दिवशीही नेहमीप्रमाणे
आम्ही एकत्र चालत होतो,
हसत होतो,
खेळत होतो,
अन उडान पाखरांसारखे
भान हरवून
आकाशात स्वच्छंद पहुडत होतो...
पण या गमतीजमतीत
आमच्या नागमोडी पायवाटा
कधी भटकल्या कळलच नाही,
अन भान आलं तेव्हापासून ते आजवर
ते निरागस पाखरू पुन्हा कधी सापडलंच नाही!
त्याच्या शोधात मी
वेड्यासारखा भटकत राहिलो,
स्वतःच्याच प्रतिबिंबात
त्याला शोधत राहिलो,
पण तरी हजारांच्या गर्दीतही
मी फक्त त्याचाच मित्र बनून राहिलो...
माझा तोच मित्र हरवलाय,
सापडला का तुम्हाला?
-ऋषीकेश
तो सापडला का तुम्हाला?
मला तो नेहमी म्हणायचा,
जेव्हा तुला माझी गरज पडेल
तेव्हा तुझ्यासाठी मी असेल,
तुझ्या आधी,
तुझ्या शेजारी,
अन तुझ्या सोबतीला...
पण मी त्याला
कधी असं म्हणालोच नाही
आणि त्यानेही कदाचित
कधी अपेक्षा ठेवली नाही
कारण
आमच नात शब्दांच नव्हत,
ते दोन मनांच होत,
दोन हृदयांच होत,
अन एका आत्म्याच होत...
त्या दिवशीही नेहमीप्रमाणे
आम्ही एकत्र चालत होतो,
हसत होतो,
खेळत होतो,
अन उडान पाखरांसारखे
भान हरवून
आकाशात स्वच्छंद पहुडत होतो...
पण या गमतीजमतीत
आमच्या नागमोडी पायवाटा
कधी भटकल्या कळलच नाही,
अन भान आलं तेव्हापासून ते आजवर
ते निरागस पाखरू पुन्हा कधी सापडलंच नाही!
त्याच्या शोधात मी
वेड्यासारखा भटकत राहिलो,
स्वतःच्याच प्रतिबिंबात
त्याला शोधत राहिलो,
पण तरी हजारांच्या गर्दीतही
मी फक्त त्याचाच मित्र बनून राहिलो...
माझा तोच मित्र हरवलाय,
सापडला का तुम्हाला?
-ऋषीकेश


माझे पण कितीतरी मित्र हरवले आहेत रे .. भेटलेच कुठल्या आयुष्याच्या वळणावरती तर सांग त्याना एक वेडा वाट पाहत आहे त्यांची ..परत एकदा स्व्च्द्नी उडण्या साठी..शहाण्यांच्या जगात मुर्खासारखा वागण्यासाठी :)
ReplyDelete