कुठ हरवलास तू???
आठवत राहील मला,
त्याच्याबरोबर घालवलेला तो प्रत्येक क्षण,
त्याच्याबरोबर घालवलेला तो प्रत्येक क्षण,
त्याच्याबरोबर मारलेल्या
विश्वाची कोडी सोडवायच्या त्या गप्पा...
आठवत राहील मला ,
शाळेच्या पायऱ्यांवर एकत्र पाहिलेली
ती मोठी मोठी स्वप्न,
ती उडायची चिकाटी
अन जग जिंकायचा विश्वास...
आठवत राहील मला,
त्याचा तो मदतीला नेहमीच
पुढे असलेला हात...
माझा तो खडतर प्रवास
अन त्याने कधी न सोडलेली साथ...
आठवत राहील मला,
त्याच्याबरोबर केलेला तो अविस्मरणीय प्रवास!!!
पण आज...
आज मी इथ एकटाच उभा आहे,
खांद्यावर जवाबदाऱ्याच ओझं,
माझी यशापयशाची हेलकावणारी नाव,
अन आयुष्यात पदोपदी वादळ आहे...
वाटल नव्हत इथवर येईल आयुष्य
अपेक्षेपेक्षा जरा जास्तच लांबला हा प्रवास,
तो मागच्याच थांब्यावर उतरला
आणि पुढच अंतर आता
मला एकट्यालाच कापायच आहे...
मला एकट्यालाच कापायच आहे...
पण तरीही नेहमीच आठवत राहील मला
माझा तो प्रत्येक मित्र,
माझा तो प्रत्येक मित्र,
कारण वाढली असतील आमच्यात भौतिक अंतर
पण तरी त्याच्या आठवणी
माझ्या हृदयात अजूनही ताज्या आहेत,
गळाला जरी हा देह क्षणभर तरी तो आजही म्हणतो,
"मित्रा उठ, अजून आपल्याला खूप अंतर चालायचं आहे!!!"
गळाला जरी हा देह क्षणभर तरी तो आजही म्हणतो,
"मित्रा उठ, अजून आपल्याला खूप अंतर चालायचं आहे!!!"
- ऋषीकेश

Comments
Post a Comment