एक प्रेम कहाणी - प्रेम उरलंय पण अपेक्षा उरल्या नाहीत...
"कोण तू?
तुला ओळखत नाही...
कोण मी?
तुला ओळखत नाही...
कोण मी?तुला कधीच विसरू देणार नाही!
जर जगू शकतेस तू माझ्याशिवाय,
मग मीही का जगू शकत नाही?"
असं म्हणायचं असत खर,
पण कंठातून शब्द फुटता फुटत नाहीत...
तुझी वाट बघून बघून आता थकलोय मी,
मनात एकच विचार घर करून बसलाय,
तुला विसरण्यासाठी तुला स्वार्थी म्हणून
मनातून कायमचंच झटकून टाकावं...
पण पुन्हा भिजतात तळवे
तू माझ्यासाठी ढाळलेल्या त्या अश्रूंनी
अन जिभेच हाड वळता वळत नाही!
मग असंही वाटत,
तुला पुन्हा एकदा गळ घालावी,
अन पुन्हा एकदा आपली ही रुक्ष बाग
आठवणींच्या गुंजारवाने भरून जावी...
पण आज जेव्हा बघतो
ही खळखळ हसणारी चंद्राची चांदणी
वाटत ही अमावस्येची काळरात्र
अशीच मंद जळत राहावी!
हे खर कि मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही,
पण तुला दिलेली शपथ
"प्रत्येक संकटात मी आधी तू नंतर" विसरून
या अडखळत्या श्वासांना पूर्णविरामही देऊ शकत नाही,
अशी आहे माझी प्रेम कहाणी,
जिच्यात आता फक्त तुझ्यावरच प्रेम उरलंय,
पण तुझ्या सुखाशिवाय कुठलीच अपेक्षा उरली नाही!!!
-ऋषीकेश

Rushya bhari hilitoyes re ..lage raho Rushi bhaay :)
ReplyDelete@भावलेलं पान dhanyawad... mala apale shubh naam kalel ka?
ReplyDeleteखूप सुंदर ...!!
ReplyDeleteThnx RupS :) you know what lines I really liked in this???
ReplyDeleteपण आज जेव्हा बघतो
ही खळखळ हसणारी चंद्राची चांदणी
वाटत ही अमावस्येची काळरात्र
अशीच मंद जळत राहावी!
pahr wichar kela ani tevha kuth hi line suchali... phar bhari pan watal :)
sundar ...
ReplyDeletekaljala bhidnari ol konti asa wicharla asta tar mi suddha hich niwadli asti
:)
This comment has been removed by the author.
ReplyDeleteultimate :)
ReplyDeleteI like these lines
जिच्यात आता फक्त तुझ्यावरच प्रेम उरलंय,
पण तुझ्या सुखाशिवाय कुठलीच अपेक्षा उरली नाही!!!
Love strangles the feeling behind the word 'want'....That's what makes it unimaginably beautiful!!!
@Mayur:
ReplyDeleteYou are damn right about word 'WANT' which we use to express our FEELINGs, our Affection through our Eyes, Speech, Touch, almost everything but bloody LOVE rules the HEART which makes these FEELINGs PAINFUL, oh sorry, which makes these FEELINGs BEAUTIFUL!!! :P