मला पुन्हा एकदा लहान व्हायचंय...

फक्त एक दिवसासाठी का होईना
पण पुन्हा एकदा मला
तुझ्याएवढ लहान व्हायचंय,

माझ्या हाताची बोट
तुझ्या बोटांएवढी लहान
होती कि नाही पहायचंय,
आणि लहानपणी मीही
तुझ्याइतकाच गोंडस
होतो कि नाही बघायचंय!

वाऱ्याची मंद झुळूक
गालांना शिवून गेली कि
मला हळूच पापणीला
पापणी लावून झोपायचंय,
आरशासमोर बसून
स्वतःच्या नजरेतलं ते
हरवलेल निष्पाप, निर्विकार,
निरागसपण शोधायचंय!

एक शेवटचंच खर,
पण पुन्हा एकदा
गुलाबाच्या कळीप्रमाणे
खळखळून हसायचंय!!!

-ऋषीकेश

Comments

  1. chaan..hey serva ata pan karata yeil..pan lahan panchi niragasta ata jamel ki nahi sangata yet nahi re

    ReplyDelete
  2. khar ahe, pan manus tech magto na je tyala sahsa milan shaky nasat... mihi asach kahi tari maghatoy...

    ReplyDelete

Post a Comment