खऱ्या सत्याचा शोध...

म्हणतात जग गोल असत,
पण मग ते सपाट का भासत?
म्हणतात दुःखातच आनंद असतो,
पण मग दुःख झाल कि वाईट का वाटत?
जर प्रत्येक गोष्टीत असेल असा हा विरोधाभास
मग सत्य तरी नेमक काय असत?
माणूस शेवटपर्यंत शोध घेतो तो या प्रश्नाचा,
पण त्याला उत्तर उमगत नसत!
पण या सत्याच्या खोदकामात थकून गेल्यावर
त्याला तो शेवटचा श्वास घेता-घेता तरी
उमगत असेल का कि
खर 'सत्य' ते हेच असत???
-ऋषीकेश

Comments
Post a Comment