असही असत हे प्रेम???
प्रेम असाही असत, एकतर्फी - दिवा अन पतंगीसारख???
दोघे जवळ असले कि पतंगीने त्या दिव्यावर स्वतःच्या जीवाला वेड्यासारखा जाळाव...तिला चटका बसू नये म्हणून भोळ्याभाबड्या दिव्याने लांब पळाव तर पतंगीने त्याला पाठलाग करून
पुन्हा गाठाव, पुन्हा जळाव अन पुन्हा त्या बिचाऱ्यालाही
त्याच्याच जाळात जाळाव!!!
असं तर नाही ना कि त्या कविराजांना म्हणायचं होत कि,
खरच प्रेम म्हणजे प्रेम असत,
तुमच आमच सेम असत,
तू माझ्यावर प्रेम करत नसशील,
पण तुही माझ्याबरोबर जळायच असत!!!
खरोखर प्रेम इतक क्षुद्र असत???
नक्कीच नाही पण वाईट याच वाटत कि प्रेम करणाऱ्यांनाच त्यांच्या प्रेमच मोठेपण कळत नसत... :'( :'( :'(
खरतर,
खरच प्रेम म्हणजे प्रेम असत,
तुमच आमच सेम असत,
प्रेयसीचा सहवास नसेल मिळाला,
पण तिच्या नाजुकशा आठवणींबरोबर
असं हे प्रेम फक्त करायचं असत... असं हे प्रेम फक्त करायचं असत!!!
-ऋषीकेश

Comments
Post a Comment