शब्दांआड...





कविता करत करत नेहमीच अश्रूंना शब्दांआड लपवलं,
स्वतः हरलो पण तुला नेहमीच जिंकवल...

आज तुला हरवायचं नव्हत,
पण पहिल्यांदा मलाही जिंकायचं होत...
क्षणभर का होईना,
तुला स्वतःच्या बाहुंमध्ये जखडायच होत,
तुझ्या सहवासाच्या त्या दोन-अडीच क्षणांनाही
एका आयुष्याप्रमाणे जगायच होत...


-ऋषीकेश 

Comments