तू नेहमीच अशी रुसतेस
काय विचार करतीयेस, परतायचा कि कायमचंच निघून जायचा???
कुठलाही निर्णय घे,नेहमीप्रमाणे मी तुला आजही अडवणार नाही,
फक्त एकच गोष्ट लक्षात ठेव,
आलीस तर अशी ये कि
माझ्यावर पुन्हा कधीच अशी रुसणार नाहीस,
अन गेलीस तर अशी जा कि
माझ्या आयुष्यात पुन्हा कधीच परतणारच नाहीस!!!
कारण येऊन जर गेलीस तू पुन्हा
तर हि सोन्याची लंका मला दुसऱ्यांदा जळताना बघवणार नाही...
अन जाऊन जर आलीस तू पुन्हा
तर माझी झालेली राखरांगोळी तुलाही बघवणार नाही!!!
कालपर्यंत या वळणावर सार जग मला माझ भासायच,
पण आज जर तू गेलीस तर इथ मीही स्वतःचा राहणार नाही,
त्यामुळ आज जर पाठ फिरावाणारच असशील
तर नेहमीप्रमाणे एक शेवटची नजरेला तुझी ती नजर भिडू दे,
उरल आयुष्य पुरेल इतक तुला स्वतःच्या हृदयात भरून घेऊ दे!
आणि विसरू नकोस हि आपली शेवटची नजरांची भेट असेल,

त्यामुळ पापणी लवलीच तर दोन टपोरे थेंब गालावरून हळूच गळू दे,
कारण मलाही कळू दे कि एक वेडी रुसुनही
हृदयाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात माझ प्रेम दडवून बसली आहे,
इकड हृदयात जो कलह चालू आहे तो तिकडही चालू आहे,
आणि हे क्षणभराच रंगलेले नाटक लवकरच संपून,
माझ रुसलेल बाळ माझ्या मिठीत स्वतःला लपवून खुदकन हसणार आहे!!!
- ऋषीकेश

Comments
Post a Comment