निर्दयी...



कोण...  कोण येतंय ते इकड, 
ती...  ती तू तर नाहीस?
कोण... कोण चाललंय ते तिकड,
ती...  ती तू तर नाहीस?

किती निर्दयी असशील ना तू,
स्वतःच विखुरलेल्या या काळजाचे तुकडे तुडवत तुडवत गेलीस खरी,
पण या रक्ताच्या थारोळ्यात तुझ्याचसाठी तडफडणाऱ्या प्रियकराला  
तू एकदा पाठमोरी वळून बघितलंही नाहीस...


-ऋषीकेश

Comments