एक संन्यासी अन एक अप्सरा...


कधी तू हसलीस कि तुझ्या ओठांवरून 
अन गालावरच्या खळीवरून कोणाला घसरताना बघितलंयेस?
कधी तू तुझ्या घाऱ्या डोळ्यांमधे कोणाला  बुडताना बघितलंयेस?

कधी तू तुझ्या काळ्याभोर केसुंमध्ये कोणाला भटकताना बघितलंयेस?
कधी तू तुझ्या निर्मळ नि कोरीव कायेच प्रतिबिंब विवस्त्र होऊन बघितलंयेस?

कधी तू त्या झऱ्यात स्वच्छंद न्याहताना 
या संन्यास्याला तुझ्या सौंदर्यावर झुरताना बघितलंयेस?

मी नेहमीच तू हसलीस कि 
तुझ्या लाल-लाल ओठांवरून फिरता-फिरता घसरतो,
मी नेहमीच दुरूनच 
तुझ्या डोळ्यांमधल्या गहराईचा ठाव लागेपर्यंत बुडतो...

मी नेहमीच तुझ्या काळ्याभोर केसुंच्या गर्द छायेत भरकटतो,
मी नेहमीच तुझ ते प्रतिबिंब पाहून कुणास ठाऊक कसा, 
पण पापणी लवण्याआधीच मेणासारखा विरघळतो...

नावतरी काय आहे तुझ, मेनका कि उर्वशी?
काही असो, पण तुझ अप्रतिम सौंदर्य बघून
मी संन्यासीहीं क्षणभर तुझ्या प्रेमात पडतो!!!

- ऋषीकेश 

Comments