सरळ सोप सुंदर...
हरवून बसलो सगळ कि
'त्याला' कितीही दोष देऊन हरवलेलं परत सापडत असत का?
डोळे झाकून जर घेतला शोध तर स्वतःचा तरी पत्ता लागत असतो का?
भूतकाळ होता तो विसरून जा त्याला,
बघ आजचा दिवस तुझ्यासाठी काय-काय नवीन घेऊन आला...
आणि तसाही अजून सगळ संपलाय कुठ,
तुझ भविष्य अजूनही तुझ्या समोर आहे...
तुटल असेल एक,
पण अजूनही तुझी कितीतरी स्वप्न उपाशी आहेत!!!
म्हणून अजून काही गमावण्याआधी,
बनवणाऱ्याने तुला नि या दुनियेला किती सुंदर बनवलाय हे डोळे उघडून बघशील जरा,
खांदे टाकून बसलायेस काय?
फक्त एकदा खळखळून हसून बघ, जगण किती सरळ आणि सोप असत हे समजेल तुला!!!
-ऋषीकेश


Comments
Post a Comment