इथे कोणाकोणाला GIRLFRIEND असतात???




























बागेत कधीही गेले कि ते प्रत्येक बाकड्यावर हजारोच्या संख्येने असतात,
पण सगळेच त्या सुंदर-सुंदर मुलींशेजारी माकडासारखे दिसतात...
मग वाटत भगवंता इथे कोणाकोणाला GIRLFRIEND असतात???

जेव्हा ती mood मध्ये असते 
तेव्हा तिला एखादा PJ सांगून तिचा mood घालवतात...
अन जेव्हा तिचा mood नसतो 
तेव्हा एखादा जालीम PJ सांगून तिच्या mood चे ३-१३ नी ९-१२ वाजवतात...

जेव्हा तिला हसायचं असत
तेव्हा तिला रडवतात,
अन जेव्हा तिला हक्काने रडवून तिच्या गालावारेचे टपोरे थेंब पुसायचे सोडून 
तेव्हा तिच्याबरोबर माकडासारखे कुठेही भटकत बसतात...
पांडुरंगा, बघ आजकाल इथे कोणाकोणाला GIRLFRIEND असतात???

ती लाडात येऊन म्हणते "चालणारे बागेत जाऊ???"
तेव्हा हे तेंडूलकर IND -BAN ची match बघत बसतात...
मग ती नाराज झाली कि 
संध्याकाळी तिला Shopping ला तुळशीबागेत नेऊन
तिच्याबरोबर हमालासारखे फिरतात...

जेव्हा कधी ती बगळ्यासारखी मान हजारदा हलवून 
तिची नवीन Hair-Style दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न करते
तेव्हा हे Ranka Jewellers तिच्या त्या झीप्र्यांमध्ये 
शोधूनही सापडणार नाही अस कानातल बघतात...
अन चक्कर येईसपर्यंत गोलगोल फिरून 
जेव्हा हि Beauty-Queen नवीन Dress दाखवते
तेव्हा हे घोडे तिच्या टपटप वाजणाऱ्या जुन्या Sandal कडे बघतात...
विठ्ठला धावरे बाबा, बघ इथे कोणाकोणाला GIRLFRIEND असतात???

वाईटतर तेव्हा वाटत जेव्हा तिने लाडात येऊन डोळे मिचकावले कि
हे एखाद्या Doggy सारखी जीभ बाहेर काढून धावतपळत जातात...
अन तिने हळूच गाल पुढे केला कि
हे चावट तिच्या गालावर हळूच एक चापट मारतात...
असे हे बहाद्दर ती तिखट असली कि तिच्याबरोबर आंबट चाळे करतात,
अन जेव्हा ती आंबट असते तेव्हा यांना पाणचट चाळे सुचतात...

नक्की अश्याकश्या जोड्या लावतोसरे तू,
खाली येऊन बघ कधीतरी, इथे कोणाकोणाला GIRLFRIEND असतात???

कधी चांगल्या ठिकाणी फिरायला गेल की हे GIRLFRIEND इतके चिटकतात, इतके चिटकतात,
शेवटी या अप्सरा त्याच्याशी हा माझ्याबरोबर नाही
अश्या Attitude ने वागून स्वतःचा उरलासुरला Sense of Humor दाखवतात...
अश्या या बाजीराव-मस्तानीच्या Break-upची बरेच पेशवे आतुरतेने वाट बघत असतात,
पण या पानिपतच्या युद्धात शेवटी तेही पेशवे धारातीर्थी पडतात...

वाटल होत,या घोर कलियुगात तरी तू TREND बदलशील,
पण आजही तुझ्या या दुनियेत कोणाकोणाला GIRLFRIEND असतात???

-ऋषीकेश

Comments