एक छोटासा प्रवास आणि ...!!!

सगळकाही सुरळीत चाललं होत
पण नकळत कुठूनतरी आलीस तू,
एकटाच होतो मी चालत या वाटेवर
पण नकळत मला
या माणसांच्या गर्दीत घेऊन आलीस तू!

सारकाही नवीन होत माझ्यासाठी
ती बाहेर पडलेली गुलाबी थंडी,
ती त्या बागेतली हिरवळ,
तो चिमण्यांचा कलकलाट,
पण त्याहूनही आल्हाद अन उबदार होता
तू दिलेला तो क्षणभंगुर सहवास!

आता वेळ गेल्यावर वाटतंय खर कि
एवढा विचार करायला नको होता,
पण तेव्हा नकळत तुझ्या सहवासात
तुझ्याबरोबर पाहिली होती खूप सारी स्वप्न,
बांधलं होत आपल्या तिघांसाठी छानसं घरट!

जशी माघशील तशी साथ तुला देतो,
तुला मित्र हवा होता म्हणून
तुझ्याशी खोटखोट भांडणारा मित्र बनलो,
तुला हवा होता सोबती म्हणून
तुला जन्मभर साथ देणारा सोबती बनलो,
जर कधी झालीस तू निराश
तर तुला हवा होता आधार म्हणून
तुला सावरणारा आधारही मी बनलो...
असच म्हण कि त्या छोट्याश्या प्रवासात
"मी तुझं सर्वस्व बनलो"!!!

कोणाला माहिती होत कि
आपला हा प्रवास क्षणभराचाच उरलाय,
वाऱ्यासारखी उडून गेली वेळ
अन माझा सुखाचा प्रवास आता इथचं संपलाय!
या वाटेवर एकटा चालणारा हा जीव
आज तुझ्या दुराव्याने चौफेर विखुरलाय,
सगळ इतक्या झटकन घडल कि
स्वतःला सावरण्याआधीच
या माणसांच्या गर्दीत कुणास ठाऊक कुठेतरी हरवलाय.......

- ऋषीकेश

Comments