मनाने फक्त माझीच रहा...
तू नव्हतीस तरी तू होतीस,
तू होतीस तरी तू नव्हतीस...
तू रुसलीस तेव्हा मी मनसोक्त हसलो,
तू खुदकन हसलीस जेव्हा मी रुसलो...
तुला न्याहाळताना तुझ्या ओठांवरचा प्रत्येक शब्द मुका होता,
तू नजरेआड गेलीस कि तोच शब्द त्या एकांतात माझा सखा होता...
तू सोबत होतीस तरी आपल्यात एक दुरावा होता,
तू दुर होतीस तरी तुझा आभास माझ्याबरोबर होता...
कुठही राहशील पण नेहमी अशीच रहा,
जरी नाही होऊ शकलो तुझा तरी मनाने फक्त माझीच रहा!!!
- ऋषीकेश


Comments
Post a Comment