तुला मिठीत घेऊन सार जग जिंकल्यासारख वाटलं...
तुझी ती ओशाळलेली नजर अन शहारलेली काया बघून
तुला बाहुंमध्ये घट्ट जखडावस वाटलं...
गारवा होता ना त्यादिवशी???
म्हणून स्वतःला तुझ्या ओढणीमधे लपवून घ्यावसं वाटलं!!!
गालावर वाऱ्याबरोबर उडणारी ती बट
अन थरथरत्या बोटांशी माझ्या बोटांना खेळावस वाटलं...
तुझ्या लाल-लाल ओठांवर
माझ्या चावट ओठांना स्वतःच नाव कोरावास वाटलं!!!
माझ हृदयही क्षणभर स्तब्ध झाल्यासारख वाटलं...
जगण्याच्या शपथा घेण्याआधीच
विरहाच्या दुःखात त्या डोळ्यांतून वाहणाऱ्या पाण्याने
माझं सार माळरान पेटवल्यासारख वाटलं!!!
तुझं हे आभाळाएवढ प्रेम बघून
तुझ्या प्रेमात नखशिखांत बुडून जावस वाटलं...
आनंद मावेना गगनात कारण
या रोमिओला शेवटी जुलियट मिळवल्यासारख वाटलं...काल तुला मिठीत घेऊन सार जग जिंकल्यासारख वाटलं......................
- ऋषीकेश


Comments
Post a Comment