हा दुरावा - अंतर कि एक कविता...




आजकाल लोकं विचारतात मला,
"खूप दिवस झाले तू कविता का नाही केलीस???"

काय सांगू त्या वेड्यांना
तुझा-माझ्यातल अंतरच खरी कविता आहे,
अन तुझा-माझ्या कवितेतले हे सारे शब्द
आपल्यातला दुरावा मोजायची परिमाण आहेत...

पण माझ्यापासून मैलो दूर असतानाही
आज तू हृदयाच्या खूप जवळ आहेस,
म्हणून तर तुझा-माझ्या या कवितेला
चार ओळींपुढ जायला शब्दही सुचत नाहीयेत!!!

- ऋषीकेश

Comments

Popular Posts