काळजी करणार कोणी असेल तर...




काळजी करणार कोणी असेल
तर दुखापत होण ही किती छान असतं...

मैलांवरून तुला ओढून आणायचं असेल
तर कुठतरी धडपडाव लागतं,
तुझ्या मांडीवर डोक ठेऊन झोपायचं असेल
तर अधून-मधून आजारीही पडाव लागतं...

माझ्या हसऱ्या फुलाला रडवायचं असेल
तर तुझ्याबरोबर खोट-खोट भांडाव लागतं,
कधी तूला मिठीत घ्यावास वाटल
तर तुझ्यासमोर खोट-खोट रडावं लागतं...

तुझ्या गालांवर हसू फुलवायचं असेल
तर तुझ्याशी एखाद्या बाहुलीसारख खेळावं लागतं,
अन जर तुला लाजवायच असेल
तुझ्या कानात प्रेमाचं "अडीच अक्षर" कुजबुजाव लागतं...

अस आजकाल तुझ्यावर माझ्यापेक्षा
खर राज्य तर माझ्या बहाण्यांच  असतं,
पण तुझ्या प्रेमाची नशा चढवण्यासाठी
मला नेहमीच वेदनांच हे विष घोटभर प्यावं लागतं!!!

- ऋषीकेश 

Comments