आयुष्यात काही व्यक्तीं अशाही येतात...

आयुष्यात काही व्यक्तीं अशाही येतात,
आपण त्यांना नि तेहि आपल्याला ओळखत नसतात,
पण तरी काहीं एखाद्या वैऱ्यासारखे नजरा मुरडतात,
तर काहींच्या नजरा नजरेशी क्षणभर भिडतात।।
असे हे अनोळखी लोकं आपले नसले
तरी नकळत आपलेसे बनून जातात...
दूर असताना नाही पण समोर आले कि
कधीच नजरेआड जाऊ नये असे वाटतात ।।
एक दिवस निघून जातात सारे,
मग आपण त्यांना नि तेहि आपल्याला विसरतात,
अन लवकरच त्यांच्यामागे
त्यांच्या अस्तित्वाचेही गंध विरतात।।
पण पुन्हा चुकून भटकली पावलं त्या थांब्यावर
तर हृदयाच्या कोपऱ्यात लपलेले
हे लबाड जुन्या आठवणी पुन्हा जिवंत करतात,
कधी हसवतात, कधी रडवतात,
अन जाता-जाता हृदयाच्या कोपऱ्यात बनवलेलं
आपलं छोटस घर वीतभर रुंदावूनहि जातात।।
आयुष्यात काही व्यक्तीं अशाही येऊन जातात.....
- ऋषीकेश

Comments
Post a Comment