फक्त तू...



खूप प्रेम करतेस तू माझावर,
खूप आधारही देतेस मनाला...

पण म्हणून तुझ्या प्रेमाची परतफेड
अशी कशी मागितलीस तू?
जर दूरच जायचं होत अस
तर इतक्या जवळ आलीसच कशाला तू???

जगायचंच होत तुझाशिवाय
तर खूप जण बसतात या बाजारात...
कोणी ना कोणीतरी
मला भेटलंच असतंना माझ प्रेम विकायला???

पण तरी मी हा दुःखांचा अजस्त्र वटवृक्ष जगवला
कारण माझ वेड हृदय
शेवटपर्यंत म्हणत राहील, "मला हवी आहेस तू अन फक्त तू!!!"

- ऋषीकेश

Comments