भीती वाटते...
आज तू आहेस खरी माझाबरोबर,
पण भीती वाटते पावलोपावली 'जर-तर' म्हणणाऱ्या या आयुष्याची,
जगाची काय हिम्मत तुला दुखवायची,
खरी भीती वाटते माझ्याकडूनच तू दुखावली जायची!!!
जेव्हा नव्हत कोणी जोडीला,
भीती वाटायची एकटच जगावं लागतंय कि काय याची,
आता आहे तुझी साथ,
तर भीती वाटते आयुष्याच्या कुठल्याही वळणावर तुला गमवायची!!!


Comments
Post a Comment