गगना गगना बरस...
आज मी प्रवासात असताना, गाडीच्या खिडकीतून सहज बाहेर डोकावून पाहिलं. एक पाखरू शेतामधे एका मातीच्या ढेकळावर बसून आकाशाकड आस लावून एकटक बघत होत...
जणू ते त्या अंबराला विनवणी करत होत,
" गगना गगना बरस,
माझं सार माळरान ओसाड पडलंय...
गगना गगना आतातरी बरस,
त्या बागेतलं फुलंहि तुझ्यावर हिरमुसलंय...
गगना गगना बरस,
हे आईचं पिल्लू तृष्णेला तहानलंय...
गगना गगना आतातरी बरस,
या
चिमुकल्याच आतड अन्नाच्या दाण्याला तरसलंय...
गगना गगना बरस,
बघ माझ्या आईचं उदर उघड पडलंय...
गगना गगना धोधो बरस,
तुझ्या प्रेयसीच हिरव पातळ फाटलंय..."
"ही अवस्था फक्त त्याची एकट्याचीच नाहीये, ती माझीपण आहे नि तुमचीपण...
त्यामुळ देवकरो या चिमुकल्या पाखराची प्रार्थना ऐकून त्या अंबरालाहि पाझर फुटो
अन सारा आसमंत अमृताचे अश्रू बनून लवकरच धोधो बरसो!!!"
- ऋषीकेश

Comments
Post a Comment