माझी बायको आहे कि कटकट

ही माझी बायको आहे कि कटकट,
किती पिडते ही मला...
खूप केल सहन
पण आता मात्र कहर झाला...
सकाळी ऑफिसात निघायला
उशीर झालाय
पण डब्बा अजून तयार नाही...
संध्याकाळी थकून आलो घरी
तरी हिच्या तोंडाचा पट्टा सुरूच,
बडबड ऐकून-ऐकून
एक क्षणही डोक्याला शांती नाही...
या अप्सरेची शॉपिंग करायला
तासाभरापूर्वी तुळशीबागेत निघालो
पण यांचा मेकअप अजून आवरला नाही...
तुळशीबागेत घातली दुकानदाराशी हुज्जत
पण टिकल्यांच पाकीट सोडून
तिने दुसर काहीच घेतल नाही...
अहो हे तर सोडाच,
बाहेर छाती काढून फिरणारा वाघ
त्याला घरात काडीची किंमत नाही...
एरवी झुरळालाही घाबरणारी
ही झाशीची राणी
डोळे वटारले तरी मला कधी घाबरली नाही...
पगार होऊन साडी नाही घेतली
कि चहात साखर
नि यांच्या लाडक्या चिरंजीवांना झापल
कि भाजीत मीठ पडत नाही...
जर कधी आलो डुलत-डुलत घरी
तर घराच दार रात्रभर उघडत नाही...
लग्नाआधीच गुलाबच फुल
आता दगडी फुल झालाय,
तेव्हाच्या चवळीच वजन
आता हत्ती एवढ वाढलंय...
पण तरी रस्तावरून जाताना
सुंदर-सुंदर चेहरे सोडाच
पण मला टीव्ही वरच्या
नट्यासुद्धा ही बघू देत नाही...
पण तरी जीव जळतो तिच्यावर
कारण तिला ह्रितिक जरी आला समोर
तरी माझाशिवाय दुसर कोणी दिसत नाही...
करत असेल दिवसभर कटकट एवढी
पण रात्री थकलेले लाडोबा झोपतात असे कि
त्या बाहुलीला कवटाळून झोपण सोडून
दुसरा काही पर्यायच उरत नाही!!!
- ऋषीकेश

Comments
Post a Comment