हरलो हे आयुष्य
हे आयुष्य आहे अपेक्षांचं खूप मोठ्ठ ओझं,
पेलवण्याचा खूप केला प्रयत्न
पण आज मणक्याच हाडच मोडून गेलं माझं!!!
काल नात जपण्यासाठी झगडत होतो
तर आज घर जळताना बघत होतो...
काल त्या उद्ध्वस्थ खिंडारात उभा राहून
अपयशाच्या दुःखात तीळतीळ जळत होतो,
तर आज आयुष्याची राख चौफेर उधळताना
स्वतःच्या उघड्या डोळ्यांनी बघत होतो...
कळत नव्हत काय कराव,
पण हरायचं नव्हत मला
म्हणून जिंकण्यासाठी केली प्रयत्नांची शर्थ...
पण शेवटी पुन्हा ठरलो अडाणी,
पुन्हा अपयशच पडलं पदरी
अन पुन्हा एकदा सारे प्रयत्न गेले व्यर्थ...
आता यशही नकोस वाटतंय,
कदाचित आलेलं हे अपयश पचवून
कदाचित आलेलं हे अपयश पचवून
जगण्यासाठी थोडीशी ताकदही पुरेशी पडेल,
पण नको वाटत आता,
कारण थकलोय मी,
आता अजून स्वतःला तुटताना बघवत नाही,
कारण थकलोय मी,
आता अजून स्वतःला तुटताना बघवत नाही,
अनावर झालंय हे दुःख,
वेदनांनी भरून गेलंय हृदय,
आता त्यात अजून एक दुःखही मावणार नाही...
आता त्यात अजून एक दुःखही मावणार नाही...
पण तरी जगावं लागतंय,
कारण खंबीर आहेत या हृदयाच्या भिंती
जरी कोसळली अजून शेकडो संकट
तरी या श्वासांची तार काही तुटणारं नाही!!!
- ऋषीकेश
जरी कोसळली अजून शेकडो संकट
तरी या श्वासांची तार काही तुटणारं नाही!!!
- ऋषीकेश

Comments
Post a Comment