प्रेम हे प्रेम असत, पण...

कोणाच्या शब्दात असत, पण कृतीत नसतं,
कुणाच्या कृतीत असत, पण शब्दात नसतं,
ज्याला दोन्हीत मिळालं त्याच नशीब असतं,
पण प्रेम हे प्रेम असत!

सगळ्यांना ते दिसावच अस नाही,
पण ज्याला दिसलं त्याला दिसलं,
ज्याला नाही बघायचं त्याला नाही दिसलं!

पण असो तरी प्रेम हे प्रेमच असत,
म्हणून तुमचं आमचं
नेहमी समेचं असाव असं थोडीच असतं???

--  (हरवलेला कवी) ऋषीकेश

Comments