अवघड आहे, पण तरी "हे" हवहवस वाटतंय...



तू जेव्हा बेंबीच्या देठापासून रडतोस,
आणि काही केल्या थांबत नाहीस,
तेव्हा आपल्याला जमेल की नाही याची शंका
अन खूप दडपणही येते!

पण जेव्हा तीच तुझी नाजूक नजर
बापाच्या डोळ्यात आशेनं बघते नी मंद हसते
तेव्हा साऱ्या  शंका, दडपण गळून पड़ते
नी  जगातली सारी सुखं तुझ्या पायी ओतू
असा आत्मविश्वास जागवते!

ही तर फक्त सुरुवात आहे
तरी भावनांचा हा ऐवढा मोठा पूर...
माहितीये,
खरंच अवघड आहे,
पण तरीही "हे" हवहवस वाटतंय!

-- ऋषीकेश

Comments

Popular Posts