ती आठवण...!





















आठवण ती असते
जी तुमची असते, तुमच्या सोबत असते!

कधी गोड, कधी तिखट
तर कधी ती आंबटही असते...

ती हसते-हसावते,
एखाद्याला हसता-हसता रडवते!

कधी कुशीत घेऊन
मायेने कुरुवाळते-गोंजारते...

तर कधी जखमेवरच्या खपलीसारखी सलते,
नकोनकोशी वाटते!

पण कशीही असली तरी ती खूप अनमोल असते,

कारण आयुष्यात प्रसंग हजारो येतात
पण आठवण एखादीच बनते,
आणि तुमच्या नकळत मनात घर करून जाते !!!


- ऋषीकेश

Comments

Popular Posts