आज आहे पण उद्याच माहित नाही!!
आज आहे पण उद्याच माहित नाही,
आहोत दूर इतके की
उद्या गेलो तरी तुला कळणार नाही,
अन् केलं होत प्रेम किती तुझ्यावर
तुला सांगाताहि येणार नाही!
पण तरी वाटत हा दुरावाच आहे
ज्यामुळे ही भावना हृदयात रुजत आहे
कोणास ठाऊक,
केलं जर मी हे प्रेम व्यक्त तुला आणि जर ... ...!
त्यापेक्षा नको,
ओठांवर शब्द असूनही मी अबोल
अन् श्वास असूनही मी निर्जीवच बरा...
कारण जोवर आहे
या हृदयात ही धकधक
अन् या प्रेमाची धगधग,
स्वतःच्या अस्तित्वाची
स्वतःला जाणीव तरी आहे!!
- ऋषीकेश

Comments
Post a Comment