जाता जाता...
आज दुरूनच देतोय तुला
आपल्या आठवणींच जड गाठोड,
जाताना बरोबर घेऊन जा!
कधी आली आठवण माझी,
कधी वाटलं एकटस माझ्याशिवाय,
तर बंधनांची गाठ सोडून
यात क्षणभर तरी बुडून जा!
जर कधी
उभे राहिले अश्रू डोळ्यात
तेव्हा निर्थास्तपणे
मैलभर तरी वाहत जा!
कारण तिथेच कुठेतरी
बुडताना दिसेल मी तुला,
जमलं आधार दे
अन् किनारा लागेपर्यंत
तिथेतरी फक्त माझीच रहा!
- ऋषीकेश

Comments
Post a Comment