*** ??? ***

प्रत्येक प्रेयसी आपल्या प्रियकराला स्वतःच अस्तित्व कधी स्पर्शाने,
कधी आधाराने,कधी विचाराने, नानाप्रकारे दाखवते!
पण माझी प्रेयसी थोडीशी खट्याळ आहे,
ती स्वतःच अस्तित्व नेहमीच माझ्याकडून लेखणीच टोक
कधी कागदावर तर कधी हृदयावर झिजवून,
शब्दांची रंगमैफिल भरवूनच दाखवते!
पण तरीही माझी प्रेयसी माझ्यावर जीवापाड प्रेम करते...


जेव्हा येतात मनी आंबट विचार तिचही अंग शहारून येत,
मग ती क्षणार्धात शब्दांनी विणलेली,
अक्षरांच्या नक्ष्यांनी मढवलेली कामुक गुलाबी पैठणी नेसून
अंग स्वर-व्यंजनांच्या शब्दालंकरांनी गच्च भरवते.
हळूहळू तिच्या डोळ्यात उतरायला लागते शब्दांची नशा,
अन गालांवर शब्दांची लाली आपोआपच चढते.
तिच्या ओठांच्या पाकळ्यांवर
मादक शब्दरसाची गंगा ओथंबून वाहते,
अप्सरानाही लाजवणारे हे धो-धो बरसणार सौंदर्य
हृदय माझं चिंब-चिंब  भिजवते!


पण जेव्हा मन माझं हिरमुसत
हेच खट्याळ, आल्हड पाखरुही माझ्यासोबत हिरमुसून जाते,
जेव्हा डोळ्यातून माझ्या वाहायला लागतात धारा
वेडी तेव्हा शब्द बनून भळाभळा वाहते.
कोणजाणे कसे पण माझ्या मनात सलणार दुःख
माझ्याही आधी तिला कसबरं समजते?
कधी लागली जर ठेच मनाला तर जखमांवर शब्दांचा लेप बनते,
जर कधी घेतली माघार तर शब्दांची शपथ घालून
गळून पडलेल्या देहाला आधार देत पुन्हा लढ म्हणते!
अशी माझी प्रेयसी माझ्यावर जीवापाड प्रेम करते...
अशी माझी प्रेयसी माझी 'शब्दांची कविता'
जिच्या शब्दातलं प्रेम मला माझंही अस्तित्व देते!!!


-ऋषीकेश

Comments

  1. mast re rushi...!
    hi kavita ninavi ch changli wattie :)

    ReplyDelete
  2. Thnx dee :)
    khartar phar wichar karunhi kahi naaw suchal nahi so ninavi ch thewali...........

    ReplyDelete
  3. काल बोललो तेच म्हणीन ... काही गोष्टी भाषेच्या आवाक्यापलिकडल्याच असतात. काहीसा विरोधाभास आहे, पण ह्याच भाषेतल्या शब्दालांकारांना साजेल असं एक नाव कधीकधी ह्याच भाषेत सापडत नाही ... मानवाच्या मनाचा थांग शब्दात मापता येत नाही.

    :)

    ReplyDelete
  4. actualy I feel that language is just a fraction of THE TRUTH but it can't be the Ultimate TRUTH, so its obvious to find such flaws in it and that makes us, humans, nothing in front of that THE ONE coz!!!

    ReplyDelete

Post a Comment