घटकाभराचा खेळ...
मला घाबरवत होती,
अन आपल्यातली मैलभराची अंतरं
शेकडो मैल दुरावत होती!
कधीकाळी आपण फुलांनी सजवलेली
हि वाट सैतानांच्या सावल्यांनी
आज गच्च भरलेली होती,
पुनवेची रात्र असूनही चांदोबाची चकती
त्या ग्रहणाने गिळली होती!
पण तरीही तुझ्या मिलनाच्या आशेने
त्या आक्राळ-विक्राळ सावल्या
मी पायाखाली तुडवत राहिलो,
इवलासा जीव मुठीत धरून
दूरवर क्षितिजावर
त्या टीमटीमणाऱ्या चांदणीला
माझ्या रुसलेल्या परीच्या
हातची जादूची कांडी समजून
वाटेत पावलो-पावली
तुझे छोटेसे अश्रुंचे थेंब
रत्न बनून लखलखत होते,
जणू मला माझ्या
हरवलेल्या परीच्या हृदयाची
चुकलेली वाट दाखवत होते!
पण पामर माझा जीव
आता पुरता थकून गेलाय,
थकल्या पायानीही साथ सोडली
तरी त्या काटेरी वाटेवर
रांगत रांगत पुढे चाललाय!
त्या क्रूर सावाल्यानीही आता त्याला
अजगराप्रमाणे आवाळलाय,
आता बस त्याचा
घटकाभराचाच खेळ उरलाय!
-ऋषीकेश



Comments
Post a Comment