आयुष्य - एक चिमणीच घरट



कधी कधी प्रत्येकाच्या मनात 
विचार येत असेल कि 
सारकाही सोडून आता फक्त स्वतःसाठी जगावं,
सगळ्या जवाबदाऱ्यांना झटकून 
स्वच्छंदी पाखरासारख आकाशात मनसोक्त उडावं।।

कधी कधी कुणाच्यातरी मनात 
विचार येत असेल कि 
किती कंटाळवाण झालाय आयुष्य,
आता या धावपळीतून स्वतःची सुटका करून
एखाद्या दाट जंगलात ध्यान लावून बसावं 
अन नक्की काय आणि कुठ चुकतंय ते शोधावं।।

कधी कधी एखाद्याच्या मनात 
असाही विचार येत असेल कि 
खूप काही चुकल हे आयुष्य जगताना,
आता थोडस थांबावं अन नवा जन्म घेऊन 
हा भातुकलीचा खेळ पुन्हा खेळावं।।

पण या प्रश्नांना कितीही दिला कोपरा 
तरी हे प्रश्न कधी संपत नसतात,
कितीही पळालात दूर त्यांपासून तरी 
तुम्हाला ते प्रत्येक वळणावर गाठतच असतात।।

त्यामुळ पळण हा पर्यायच उरत नाही,
कितीही आली वादळ
तरी माघार आता मुळीच घ्यायची नाही...
तरी जर दाटली मळभ पुन्हा मनात 
तर बघ त्या दुबळ्या चिमणीकडे,

'हजारदा पाडलंस तू तिचं घरट
तरी ती पिल्लांसाठी लढण कधी सोडत नाही,
एक दिवस परिस्थिती हरते,
पण तिची वेडी माया हार कधीच मानत नाही।।'

- ऋषीकेश


Comments