खूप दिवस झाले...


खूप दिवस झाले काही लिहायला सुचलंच नाही,
म्हणून आज पुन्हा काहीतरी लिहायचाप्रयत्न करतोय,
आज जे लिहील ते नसेलही सुंदर 
पण खूपकाही गमावलंय आजवर
आता कमीतकमी माझ्या या शब्दांनातरी मला गमवायच नाही...

दिला होता त्यांनी आधार या कासावीस मनाला,
दीली होती साथ त्यांनी सदा माझ्या या एकट्या जीवाला, 
उठलं जरी एखाद तुफानी वादळ 
तरी त्या वादळामध्येही दाखवला होता त्यांनी मार्ग,
सजवायचे ते माझं स्वप्नंच घर असं 
वाटायचं जणू धरतीवर साक्षात उतरला आहे स्वर्ग...

कोणजाणे, कसा विसरलो मी धावपळीत माझ्या या प्रिय शब्दांना???
पण आता सदा राहीतील ते स्मरणात 
कारण आता  मला चांगलच समजलंय,
त्यांच्या गैरहजेरीत माझ्या या छोट्याशा रोपट्याच पानही हलत नाही!!!

- ऋषीकेश


Comments