प्रेमात पडून भलेभले बिघडतात

सुरळीत चालू असतं आयुष्य
पण या प्रेमात पडून भलेभले बिघडतात,
काही वाल्ह्याचे वाल्मिकी बनतात
तर काही देशोधडीला लागतात...
काही मजनू बनून त्यांच्या
हरवलेल्या प्रेमाला शोधत
गल्लीगाल्लीतून भटकतात,
तरी काही गेली ती म्हणून काय बिघडलं
असं म्हणत लगेच दुसरीला शोधतात...
काही तिला वाढदिवसाची भेट
आधीच्या मैत्रिणीसाठी साठवलेला
Pocket Money तून देतात,
तर काही तिच्या स्वप्नंच घर
बांधायचं म्हणून एका-एका विटेसाठी
कष्टाचा घाम गाळतात...
काही भटकलेले जीव
यश काय होत हेही विसरून जातात,
तर काही एवढे बिघडतात कि
शून्यातून जग उभारून
यशाची सारी शिखर तुडवतात...
काही उद्ध्वस्त होतात असे
कि पिऊन हे प्रेमाच अमृत
मिळाली नाही 'ती' म्हणून हे सुंदर आयुष्य
एका घोटात संपवतात,
एका घोटात संपवतात,
तर काही त्या न मिळालेल्या प्रेमाला
मनाच्या देवाऱ्यात पुजून
उरल आयुष्य तिच्या सुखासाठी जगतात...
असतात आपल्यासमोर इतके घायाळ योध्ये
पण तरी आपल नशीब आजमवायला
अजून हजार-एक योध्ये तयारच असतात...
असतात आपल्यासमोर
इतके घायाळ योद्धे
पण तरी आपल नशीब आजमवायला
अजून हजार-एकजण तयारच असतात....
मग या लढाईत,
काही कमवतात तर काही गमवतात,
काही बनतात तर काही उधळतात,
काही कवी तर काही लेखक,
असे काही शहाणे तर काही वेडे बनतात ,
या प्रेमात पडून लोकं देवजाणे
या प्रेमात पडून लोकं देवजाणे
.
.
काय काय करतात???
करणार तरी काय ते वेडे,
अहो हे प्रेम असताच इतक विलक्षण
कि या प्रेमात पडून भलेभलेही बिघडतात!!!
- ऋषीकेश

Comments
Post a Comment