एक छोटास घरट...

हे काटे आहेत कि माया?
हि हिरवळ आहे कि संस्कार?
हा लाल गर्द रंग आहे कि हसू?
हा गंध आहे कि आनंद?
हे रोपट आहे कि एक छोटस घरट?
.
.
.
रुतलेला तो गुलाबाचा काटा असे असंख्य विचार मनात कालवून गेला...
त्या देठात दिसला मला
एक कठोर पण प्रेमळ बाप,
जो या घरट्याला पोसत होता
काटेरी होता खरं पण तो आपल्या पिल्लाचंच
या दुष्ट जगापासून रक्षण करत होता...
त्या हिरव्या हिरव्या पानांमधे
दिसली एक गृहिणी नि एक आई,
जी त्या देठाला घट्ट बिलगून होती
अन तिच्या पिल्लांना संस्कारांच बाळकडूही पाजत होती...
लाल-गर्द कळ्यांत दिसली
त्यांच्या कष्टाने-बलिदानाने वाढलेली,
त्यांच्या प्रेमाने बहरलेली,
नटखटशी-आल्हडशी त्यांची पिल्लं!
ती खळखळून हसत होती,
झुळझुळणाऱ्या वाऱ्यावर झुलत होती,
अन त्यांचा तोच आनंद सुगंध बनून
चौफेर दरवळत होती...
स्वतःचा आनंद त्या भ्रमरावर
नि त्या बागडणाऱ्या फुलपाखरांवर उधळत होती!
हा सारा भातुकलीचा खेळ बघून
मलाहि माझ मन म्हणू लागलं,
"मला कधी फुटणार हे काटे
अन कधी बिलगणार मलाही हि पान-फुले???"
- ऋषीकेश

Comments
Post a Comment