हे उनाड मन...
उजेडातही नकळत ते रस्ता भटकत,
आणि कधीकधी त्या चुकल्या वाटेवर
आपल्या भिरभिरत्या नजरेलाही घेऊन घसरत,
दिवस मावळतीला आला कि
स्वतःला कसबस सावरत,
स्वतःला कसबस सावरत,
तरी हे बेफिकेर मन घरट्यात थाटात परतत...
पण त्या घरट्याच्या उंबरठ्यावर कोणीतरी
त्याची दिवसभर आस लावून वाट बघत असतं,
अन त्याला पाहून त्या गालावर हळूच हसू उमलत,
अन त्या चिऊच्या गालावर पडलेली ती छोटीशी खळी
तिच्या हृदयातल तीच सार प्रेम व्यक्त करत...
तीच हे प्रेम बघून आता उनाड मन
हळूहळू जागेवर यायला लागत,
दिवसभरातले सारे पराक्रम आठवून
स्वतःला थोडथोड कोसायला लागत...
तेवढ्यात तिकडून एक पिटुकल-निरागस पाखरू
रांगत-रांगत मोठ्या उत्साहात
बापाच्या पायात घुटमळायला लागत,
आणि बोबड नाजुकशा आवाजात
आजच आईनी शिकवलेला एक नवीन शब्द चिरकत,
"बsssआब्बा !!!"
तेव्हा मात्र या रंगील्याच आभाळच फाटत,
हृदयात पश्चाताप आणि डोळ्यात टपोरे अश्रू उठवून
ते ओशाळलेल मन आपल्या पिल्लाला छातीशी घेऊन बिलगत...
चिमणीला कळत नाही काय झाल,
म्हणून तीही आर्त-घाबरल्या आवाजात विचारते,
"काय हो, काय झाल?"
पण आता तो काय सांगणार तिला?
मग तिला वेड "काही नाही...असंच...." म्हणत...
आणि मन मोकळ करण्यासाठी
बाळाच्या कानात पुटपुटत,
त्याला दोन नवीन शब्द शिकवत,
"पिल्ला चुकल रे माझं...माफ कर मला !!!"
- ऋषीकेश


Comments
Post a Comment