झालोत एकरूप



मला सुख म्हणजे काय हव असत,
माझं कि मला तुझ्याकडून मिळणार सुख?

मला दुखः म्हणजे काय नको असत,
मला होणाऱ्या कि मी तुला दिलेल्या वेदना?

माझ्या हृदयाला मिळणार समाधान म्हणजे काय असत,
माझ कि माझ्या सहवासात तूझ खळखळून हसण?

माझ हे अडाणी प्रेमतरी नक्की काय असत,
तुला मी कि मला तू हवीहवीशी वाटण?

आणखी कित्ती सारे प्रश्न,
पण आता आपण झालोयेत एकरूप एवढे कि
तुझ्याशिवाय माझ अन माझ्याशिवाय तुझ अस्तित्वतरी काय उरत?
त्यामुळ खरतर, आता "मी कि तू? मला कि तुला? माझं कि तुझं?"
या भाषेतल्या पर्यायांना अर्थतरी काय उरतो?

- ऋषीकेश






Comments

Popular Posts